लाडकी बहिण योजना: ११ व्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार? तारीख जाहीर!

महाराष्ट्र सरकारने “माझी लाडकी बहिण योजना” सुरू केली आहे. या योजनेत गरीब महिलांना दरमहा ₹1500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात येतात. एप्रिलमध्ये १०वा हफ्ता मिळाला होता. आता ११वा हफ्ता २४ मे २०२५ पासून मिळणार आहे.


पैसे कोणाला मिळतील?

हे पैसे त्या महिलांना मिळतील:

  • ज्या महाराष्ट्रात राहतात.
  • ज्यांचं वय २१ ते ६५ वर्षांपर्यंत आहे.
  • ज्या महिला गरिब आहेत आणि कर (Tax) भरत नाहीत.
  • ज्यांचं कुटुंब वर्षाला ₹2.5 लाखांपेक्षा कमी कमावतं.
  • ज्यांच्याकडे चार चाकी वाहन नाही (ट्रॅक्टर चालेल).
  • ज्यांचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे.
  • आणि ज्या इतर सरकारी पेन्शन योजना घेत नाहीत.

किती रुपये मिळणार?

  • सामान्य महिलांना ₹1500 मिळतील.
  • काही महिलांना आधीच Namo Shetkari Yojana मधून ₹1000 मिळाले आहेत, त्यामुळे त्यांना फक्त ₹500 मिळतील.
  • ज्यांना एप्रिलचा हफ्ता मिळाला नव्हता, त्यांना आता मे मध्ये ₹3000 रुपये मिळणार आहेत.

हफ्ता सर्वांना एकाच दिवशी मिळणार का?

नाही. सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत.
हा हफ्ता दोन भागांमध्ये दिला जाणार आहे.
त्यामुळे काही महिलांना लवकर, तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो.


यादीत आपलं नाव कसं शोधायचं?

१. आपल्या शहर किंवा गावाच्या वेबसाइटवर जा.
२. “माझी लाडकी बहिण योजना यादी” वर क्लिक करा.
३. आपलं गाव, वॉर्ड आणि ब्लॉक निवडा.
४. “View List” वर क्लिक करा.
५. यादी PDF मध्ये उघडेल – त्यात आपलं नाव शोधा.


अर्ज मंजूर झाला की नाही, कसं पाहायचं?

१. योजनेची वेबसाइट उघडा.
२. “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
३. आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका.
४. “Application made earlier” वर क्लिक करा.
५. ₹ चिन्हावर क्लिक केल्यावर तुमच्या हफ्त्याची माहिती दिसेल.


काही महिलांचे अर्ज का फेटाळले?

राज्य सरकारने ५ लाख अर्ज नाकारले आहेत.
जर अर्जात चुकीची माहिती दिली असेल किंवा पात्रता नसेल, तर हफ्ता मिळत नाही.


✅ आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे खूप महत्वाचं आहे.
✅ अर्जात दिलेली माहिती खरी आणि बरोबर असली पाहिजे.
✅ जर हफ्ता मिळत नसेल, तर लगेच वेबसाइटवर माहिती तपासा.


म्हणून लक्षात ठेवा – २४ मे २०२५ पासून हफ्त्याचे पैसे येणार आहेत!
जर तुम्ही पात्र असाल, तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील!

Leave a Comment