महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळे अनेक बहिणींना दरमहा आर्थिक मदत मिळते. या योजनेतून आतापर्यंत 11 वेळा पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता सगळ्याजणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या.
शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. 30 जून 2025 रोजी या योजनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी म्हणजेच 30 जूनपासून जून महिन्याचा हप्ता सगळ्या पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
जर तुम्हीही या योजनेत नाव नोंदवले असेल आणि पात्र असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची आहे. कारण सरकारने यासाठी तब्बल 3600 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
हा हप्ता 30 जून ते 6 जुलै या काळात सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल. त्यामुळे तुमचं बँक खातं वेळोवेळी तपासत राहा. या योजनेतून महिलांना दरमहा ₹1500 मिळतात, जे त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी येतात.
ही योजना म्हणजे महिलांच्या मदतीसाठी एक मोठं पाऊल आहे. त्यामुळे तुमचं नाव या योजनेत असेल, तर वेळेत हप्ता मिळाल्याची खात्री करून घ्या.