1880 पासून चे जमिनीचे सातबारे खाते उतारे पहा आता मोबाईलवर

आपल्याला आपल्या जमिनीचे जुने कागदपत्र, जुने फेरफार, जुने सातबारा (Satbara) किंवा खाते उतारे पाहायचे असतील तर आता ते मोबाईलवरही पाहता येतात. 1880 सालापासूनचे जुने सातबारा कसे पाहायचे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.

पूर्वी जमिनीची कागदपत्रे कागदावर असायची. काही वेळा ही कागदपत्र खराब होत किंवा हरवून जात असत. म्हणून सरकारने ही कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवरही ही कागदपत्र पाहू शकता.

चला तर मग, ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ!


जुने सातबारा ऑनलाईन कसे पाहायचे?

  1. सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ‘आपले भूलेख’ या वेबसाइटवर जायचे आहे.
    वेबसाईट आहे – https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords
  2. तिथे दोन पर्याय (Option) दिसतील –
    • जर तुमच्याकडे आधीपासून लॉगिन असेल, तर लॉगिन करा.
    • जर लॉगिन नसेल, तर नवीन नोंदणी (Registration) करा.
  3. नवीन नोंदणीसाठी New User Registration वर क्लिक करा.
  4. आता तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, पत्ता, पिनकोड, तालुका, जिल्हा अशी माहिती भरायची आहे.
  5. मग एक पासवर्ड तयार करून ‘Submit’ बटण दाबायचे. तुमची नोंदणी पूर्ण होईल.
  6. नंतर तुमचा User Id आणि Password टाकून लॉगिन करा.
  7. लॉगिन झाल्यावर Regular Search यावर क्लिक करा.
  8. आता एक नवीन विंडो (Window) उघडेल. त्यात कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव, दस्तऐवज असे रकाने (Fields) दिसतील.
  9. तुम्हाला ज्या गावाची कागदपत्रे पाहायची आहेत, त्या गावाचे कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  10. मग कोणते कागदपत्र हवे आहे ते निवडा. उदाहरणार्थ, सातबारा किंवा फेरफार.
  11. लक्षात ठेवा – त्या गावात जे कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध असतील, तेवढीच कागदपत्रे तुम्हाला दिसतील.
  12. पुढे, जमिनीचा सर्वे नंबर टाका.
  13. मग खाली असलेल्या Search बटणावर क्लिक करा.
  14. काही सेकंदात तुमच्या मोबाईल स्क्रीनवर त्या जमिनीचे कागदपत्र दिसेल.

आता तुम्ही सहजपणे घरबसल्या मोबाईलवरून जुने सातबारा आणि खाते उतारे पाहू शकता. कोणतीही कागदपत्र हरवली तरी चिंता करू नका, कारण सगळी माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे!

Leave a Comment